सुधारीत निवृत्तीवेतन आदेशात त्रुटी; परभणी जिल्हा कोषागार कार्यालयाकडून महालेखापालांकडे आदेश परत

0
WhatsApp Image 2026-09-10 at 6.56.41 PM

पेंशनधारक रमेश धोंडीबा मुलगीर यांच्या निवृत्तीवेतन आदेशातील लागू तारखेच्या मुद्यावरून पुढील कार्यवाही मागे”

महाराष्ट्र,परभणी प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

निवृत्तीवेतनधारकांच्या (पेंशनधारकांच्या) सुधारीत निवृत्तीवेतन आदेशामध्ये (Revision Order) तांत्रिक त्रुटी व दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित झाल्याने परभणी येथील जिल्हा कोषागार कार्यालयाकडून संबंधित आदेश दुरुस्तीसाठी थेट महालेखापाल (लेखा व हकदारी-२), नागपूर महालेखा कार्यालयाची मोठी (घोड चुक)निदर्शनात आली आहे पेन्शन धारक अगोदरच मानसिक व आर्थिक विवंचनेत आहे यांच्याकडे परत पाठवण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
परभणी येथील मानवत तालुक्यातील त्रिमूर्ती नगरचे रहिवासी असलेले श्री. रमेश धोंडीबा मुलगीर यांना शासनाकडून सुधारीत निवृत्तीवेतन आदेश मंजूर करण्यात आला होता. यासंदर्भात नागपूर येथील महालेखापाल कार्यालयाकडून सुधारीत निवृत्तीवेतन आदेश क्र. PR-6/1132565821/3/P/26/15/60505301 (दि. १५/०४/२०२६) जारी करण्यात आला होता.
हा आदेश परभणी जिल्हा कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर यातील नोंदींची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान, सुधारीत निवृत्तीवेतन आदेशावर ‘EFFECT FROM DT. 06/06/2032’ (*प्रभावी तारीख ०६/०६/२०३२) अशी नोंद असल्याचे निदर्शनास आले. या तारखेमध्ये दुरुस्ती असणे आवश्यक असल्याचे आढळल्याने कोषागार कार्यालयाने सदर आदेश निवृत्तीवेतनधारकास अदा न करता (ना-प्रदान शेरा मारून) पुढील दुरुस्तीसाठी परत पाठवण्याचा निर्णय घेतला.
अपर कोषागार अधिकाऱ्यांचे पत्र
जिल्हा कोषागार कार्यालय, परभणीचे अपर कोषागार अधिकारी ना. मा. बोधनकर यांनी याबाबतचे अधिकृत पत्र (जा.क्र. कोष/कावि/निवृत्तीवेतन/२०२६/१०५९०/२७२६) दि. २१/०८/२०२६ रोजी नागपूर येथील महालेखापाल कार्यालयाकडे पाठवले आहे.
या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की, “सदर सुधारीत निवृत्तीवेतन आदेशावरील लागू तारखेमध्ये दुरुस्ती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर आदेशावर ना-प्रदान (Not Paid) असा शेरा मारून पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी महालेखापाल कार्यालयाकडे सविनय सादर करण्यात येत आहे.”
प्रती व माहितीसाठी पाठवलेले संदेश:
या कारवाईची अधिकृत माहिती आणि प्रत खालील घटकांनाही पाठवण्यात आली आहे:
१. श्री. रमेश धोंडीबा मुलगीर (रा. त्रिमूर्ती नगर, मानवत, ता. मानवत, जि. परभणी – ४३१५०५)
२. मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, परभणी (४३१५०१)
या दुरुस्तीमुळे संबंधित निवृत्तीवेतनधारकाच्या सुधारित पेंशनची प्रत्यक्ष अमलबजावणी नागपूर महालेखापाल कार्यालयातून नवीन दुरुस्त आदेश प्राप्त झाल्यानंतरच होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed