कन्नड “जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री सागर जाधव यांना मराठवाडा रत्न पुरस्कार जाहीर.” कन्नड प्रतिनिधी ; रायभान साळवे

0
WhatsApp Image 2026-09-11 at 8.34.26 AM (1)

कर्मवीर काकासाहेब देशमुख आणि जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री सागर जाधव यांना मानाचा मराठवाडा रत्न 2026 हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना रविवारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते छ.संभाजीनगर च्या ट्रीट इम्पीरियल हॉटेल मध्ये दिला जाणार आहे.
विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या समाजातील व्यक्तिना हा पुरस्कार दिला जातो.
सागर जाधव हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड चे सदस्य सुद्धा आहेत,
शिक्षण क्षेत्रात त्यांनी कन्नड तालुक्यात अगदी मोलाची कामगिरी केली आहे, ते स्वतः सचिव असलेल्या कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालय त्यांच्या देखरेखीखाली अत्यंत उच्च स्थानावर नेऊन ठेवले आहे, या शाळेचा निकाल तालुक्यात सर्व शाळेपेक्षा एक न. असतो.हा पुरस्कार त्यांना जाहीर झाल्यामुळे विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
सामजिक कार्य, शिक्षण, कृषि उद्योग ,कला क्रीडा खेळ या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ति, संस्था, समूह या पुरस्काराचे नामांकन दिले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed