काँग्रेस व भाजपसह विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
गोंदियातील आमगाव तालुका येथे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजित करण्यात आले, यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दिसून आले,
सुरेशजी हर्षे यांच्या अध्यक्षतेखाली आमगावात युवकांचा उत्स्फूर्त मेळावा; साडेतीनशेहून अधिक युवकांचा सहभाग,
, खासदार प्रफुलजी पटेल व खासदार राजेंद्रजी जैन यांच्या निर्देशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटन बळकटीकरणासाठी आमगाव तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकास्तरीय युवक कार्यकर्ता मेळावा पक्ष कार्यालय, आमगाव येथे आयोजन करण्यात आले , जिल्हा परिषदेची उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती सुरेशजी हर्षे, यांच्या हस्ते तालुक्यातील साडेतीनशेहून अधिक युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
ग्रामीण पातळीवर,तालुका स्तरापर्यंत पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, युवकांचा संघटनात्मक कार्यात सहभाग वाढविणे आणि आगामी काळात गावागावात पक्षाचे कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
विविध पक्षांतील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
मेळाव्या दरम्यान काँग्रेस व भाजपसह विविध पक्षांतील कार्यकर्ते, आमगाव शहरातील व्यापारी वर्गातील युवक तसेच विविध गावांतील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला . शहरातील अभिषेकजी माहेश्वरी, अमोलजी कोठारी, सिद्धार्थजी असाठी, सुनीलजी गिरडकर, अर्जुन अग्रवाल, अश्विनजी शर्मा, अक्षदजी असाटी, राहुल तिराले, हिमांशूजी कापसे, शिवमजी अग्रवाल यांच्यासह
गावांमधील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्ष संघटनेला बळकटी देण्याच्या कार्यात सहभाग नोंदविला.
यावेळी सुरेशजी हर्षे यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पक्ष संघटनेची ताकद ही युवकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून असते. युवकांनी गावागावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. पक्ष संघटना मजबूत करण्यासोबतच सामाजिक कार्यातही युवकांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन मार्गदर्श करताना सुरेश हर्ष यांनी कार्यकर्त्यांना सांगितले,
