कन्नड “घृष्णेश्वर (वेरुळ) मंदिर सहा महिने बंद राहणार ” ? ‘विकास कामात अडथळा आणला तर कडक कारवाई ‘ उपविभागीय पोलीस. अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री
कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे
जगप्रसिद्ध श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर दिनांक 1/11/2026 पासून पुढील सहा महिने भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे, भाविकांना लवकर दर्शन घेता यावे यासाठी मंदिराच्या आवारात भुयारी मार्गाचे काम 1 ऑक्टोबर पासून सुरू होईल यावेळी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.
भुयारी मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष 1 नोव्हेंबर पासून सुरू होणार असून भाविकांची गैरसोय होऊ नये, आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. बंद काळात मंदिर अंतर्गत 3 वेळा आरती, पूजा घेण्यात येणार आहे अशी माहिती घृष्णेश्वर ट्रस्ट चे कुणाल दांडगे यांनी दिली आहे.
दुष्काळ, आणि पर्यटन हंगामात मंदिर बंद ठेवणे म्हणजे पर्यटनावर पोट भरणार्या गरीब नागरिकांना आगीतून काढून फुफाट्यात फेकल्या सारखी अवस्था, आमचा विकास कामांना विरोध नाही पण मंदिर पुर्णतः बंद ठेवणे अन्यायकारक आहे प्रशासनाने याचा विचार करावा अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सतीश लोखंडे यांनी दिला आहे.
दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी किंवा बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास दिला, हुज्जत घातली तर त्याची गय केली जाणार नाही असे उपविभागीय पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांनी ठणकावून सांगितले.
या कामाला गुरुवार पासून tसुरुवात होणार आहे तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन मंदिर समिति आणि प्रशासनाने केली आहे.
या बैठकीत उपविभागीय अधिकारी श्री संतोष गोरड,तहसीलदार संतोष गुट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, पोलीस निरीक्षक राजू तडवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिलीप कोलते, पोलीस पाटील रमेश धिवर ,ग्रामस्थ आणि प्रशासनाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कन्नड- चाळीसगाव कडून छ.संभाजीनगर (औरंगाबाद)कडे जाणारी वाहतूक वेरुळ ,कसाबखेड़ा ,
माळीवाडा, शरनापुर मार्गे छ.संभाजीनगर कडे वळविण्यात येणार आहे.
